ब्युटीफूल सई!

अभिनेत्री सई ताम्हणकरने साडीतल्या फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. 

गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत येत आहे.

अलिकडेच तिचा हिंदी सिनेमा ग्राउंड झिरो प्रदर्शित झाला. यात ती इमरान हाश्मीसोबत झळकली आहे. 

नुकतेच तिने ये रे ये रे पैसा ३च्या प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सई ताम्हणकरने यावेळी बेज रंगाची नेटेड साडी परिधान केली होती. ज्यावर फुलाची एम्ब्रॉडरी केलेली आहे.

सई ताम्हणकर साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिने साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here