'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आता फक्त मराठमोळ्याच नाही, तर ग्लॅमरस अवतारातही चाहत्यांना घायाळ करत आहे.
रिंकूने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.
रिंकूने या फोटोशूटमध्ये अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक लूक कॅरी केला आहे.
तिने व्हाईट शर्ट आणि ब्लू व व्हाईट चेक्स्चा स्कर्ट परिधान केला आहे. हा वेस्टर्न लूक तिने ज्या आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर सादर केला आहे, त्यामुळे तिचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
'आर्ची'च्या भूमिकेतून साधेपणात सौंदर्य दाखवणाऱ्या रिंकूचा हा ट्रेंडी आणि मॉडर्न अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.