कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, अभिनेत्रीचा मराठमोळा थाट

प्रिया बेर्डे यांचे पारंपारिक लूकमधले फोटो चर्चेत आले आहेत.

प्रिया बेर्डे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसह हिंदीतही काम केलंय. 

प्रिया बेर्डे एकापेक्षा एक दमदार सिनेमात झळकल्या आहेत. त्या सध्या मराठी मालिकेत काम करताना दिसत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त प्रिया बेर्डे यांनी पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, कानात झुमके घातले आहेत.

पारंपारिक वेशात प्रिया बेर्डे खूपच सुंदर दिसत आहेत. यात त्या राजेशाही अंदाजात दिसत आहेत.

प्रिया बेर्डे यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here