अभिनेत्रीने साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
प्रिया बापटने मराठीसह हिंदीतही काम केलं आहे. तिने बालकलाकार म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली आहे.
प्रिया बापट अभिनयासह तिच्या सौंदर्यामुळे सातत्याने चर्चेत येत असते. नुकतेच तिने साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.
प्रिया बापटने नुकतेच गुलाबी रंगाच्या पैठणीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने साडीवर लाँग स्लीव्हजचा हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
प्रिया बापटने साडीवर मोठे इअररिंग्स परिधान केले आहेत. केस मोकळे सोडून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोत प्रिया बापट खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रिया बापट शेवटची 'असंभव' या सिनेमात झळकली. यात तिच्यासोबत मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत होती.