क्या अदा के
जलवे तेरे पारो

प्रार्थना बेहरेचे साडीतले लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं.

'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर आणि मिसेस सदाचारी', 'मितवा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये प्रार्थनाने काम केलं आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते.

नुकतेच प्रार्थनाने साडीतले फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

यात प्रार्थनाने राखाडी रंगाची साडी नेसलीय आणि काळ्या रंगाचा स्लीवलेज ब्लाउज परिधान केलाय.

या फोटोशूटमध्ये प्रार्थनाने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्रार्थनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 प्रार्थनाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.

Click Here