जांभळ्या साडीत प्राजक्ताच्या मनमोहक अदा!

अभिनेत्रीच्या साडीतल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासोबत सौंदर्याने ती चाहत्यांना घायाळ करत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत येत असते.

नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी शेवटची चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाली. यात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळी पाहायला मिळाली.

Click Here