शुभ दिन
आयो रे...!

प्राजक्ता माळीने दिवाळीनिमित्त केले खास फोटोशूट

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्यातून रसिकांच्या मनात घर केले आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटो शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर दिवाळीनिमित्त केलेलं फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

प्राजक्ता माळीने या ड्रेसवर कानात झुमके घातले आहेत आणि केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे.

प्राजक्ता माळीने फोटो शेअर करत लिहिले की, शुभ दिपावली. शुभ दिन आयो रे! तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here