नो मेकअप लूकमध्ये 'पारू' दिसतेय सुंदर!

 'पारू' म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे हिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री शरयू सोनावणे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती  'पारू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय.

'पिंकीचा विजय असो' या मालिकेतून शरयू घराघरात पोहोचली आणि आता 'पारू' या मालिकेत पारुच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

शरयू सोनावणे हिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत शरयू नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. या लूकमध्येही ती खूप सुंदर दिसत आहे.

शरयू सोनावणेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

Click Here