शिवानी मुंढेकरचा व्हाइट साडीतील फोटो आले चर्चेत
अभिनेत्री शिवानी मुंढेकर मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सध्या शिवानी मुरांबा मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने यात रमाची भूमिका साकारली आहे.
शिवानीने रमाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झालीये.
नुकतेच शिवानीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट केलंय. यात तिने व्हाइट रंगाची साडी परिधान केलीय.
साडीवर शिवानीने नाकात नथ, गळ्यात नेकलेस, हातात गजरा घातला आहे. केस मोकळे सोडून लूक पूर्ण केलाय.
तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये चाँद सा सफेद असं लिहिले आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिले आहेत.
शिवानी मुंढेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.