मिथिला पालकरचा
 रेट्रो लूक चर्चेत

अभिनेत्रीने साडीतील लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केलं शेअर

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर मिथिलाने तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

मिथिलाने प्रामुख्याने मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

तिची ओळख 'कप साँग' या व्हायरल व्हिडिओमुळे जगभर झाली, पण अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री कमालीची सक्रिय असून तिची तगडी फॅनफोलोइंगही पाहायला मिळते.

मिथिलाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये तिने रेट्रो लूक केला आहे.

तिचा या फोटोंनी नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.

मिथिलाने २०१४ मध्ये 'कट्टी बट्टी' या हिंदी चित्रपटातून एका छोट्या भूमिकेतून अभिनयाची सुरुवात केली. पण तिला खरी ओळख 'लिटिल थिंग्स' या वेबसीरिजमधून मिळाली.

'मुरांबा' या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय तिने  'कारवाँ' आणि 'त्रिभंगा' या सिनेमात काम केलंय.

Click Here