अभिनेत्रीने सोशल मीडियावर कलरफुल साडीतील फोटो शेअर केले आहेत.
मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि सिनेमात काम केले आहे.
मिताली मयेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच मितालीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने कलरफुल साडी नेसली आहे.
मितालीने कलरफुल साडीवर व्हाइट रंगाचा स्ट्रीपवाला ब्लाउज परिधान केलाय.
मितालीने केसांची वेणी घातलीय आणि कानात सिल्व्हर रंगाचे मोठे इअररिंग्स परिधान केलेत. हातात सिल्व्हर कडा घातला आहे.
मिताली कलरफुल साडीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "फक्त रंगांना त्यांची जादू दाखवू द्या."
मितालीच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.