मानसी कुलकर्णीने नुकतेच नवीन फोटोशूट शेअर केलंय.
मानसी कुलकर्णी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत पाहायला मिळतेय.
नुकतेच मानसी कुलकर्णीने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केलीय.
मानसीने गुलाबी साडीवर पांढऱ्या रंगाचा पफचा ब्लाउज घातला आहे. कानात सिल्व्हर झुमके घातलेत. एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात कडा घातला आहे.
मानसीच्या हातात कोऱ्या चहाचा कप आहे. तिने कॅप्शनही चहाशी संबंधीत दिलंय. तिने लिहिले की, लहजा जरा ठंडा राखें जनाब.. गरम तो हमे सिर्फ चाय पसंद है..
मानसी कुलकर्णीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
मानसी कुलकर्णीने मालिकेसह सिनेमातही काम केलंय.