बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री ५६ वर्षांची असूनही सौंदर्यामुळे चर्चेत असते.
१९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या सुपरहिट चित्रपटातून तिने सलमान खानसोबत पदार्पण करून इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केलं.
'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेली भाग्यश्री वयाच्या ५६ व्या वर्षीही तिच्या सौंदर्य आणि मोहकतेने सर्वांना मंत्रमुग्ध करते.
भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
तिने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.
भाग्यश्री सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.