सध्या माधुरी दीक्षित तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. तसंच तिची गोड स्माईल भल्याभल्यांना घायाळ करते.
माधुरी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून आता ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
माधुरीचा फिटनेस आणि सौंदर्य आजही चर्चेत असते. नुकतेच तिने ब्लॅक आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या मनमोहक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
माधुरी दीक्षितच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नुकतीच माधुरी दीक्षितची नवीन वेबसीरिज 'मिसेस देशपांडे'मध्ये पाहायला मिळत आहे.
'मिसेस देशपांडे' या सीरिजला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळताना दिसते आहे.