अभिनेत्रीने इंडिगो रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.
जुई गडकरी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती ठरलं तर मग मालिकेत काम करते आहे.
सायलीच्या भूमिकेतून जुईला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेमुळे तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
जुई गडकरी हिने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत. यात तिने इंडिगो रंगाची साडी परिधान केली आहे.
तिने फोटो शेअर करत लिहिले की, आय लव्ह इंडिगो. आय लव्ह साडी. आय लव्ह ऑक्साइड ज्वेलरी.
या फोटोशूटमध्ये जुई गडकरी नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.