पर्पल चेक्स साडीत गिरीजाच्या मनमोहक अदा

अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक. अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच रंगभूमीही तिने गाजवली आहे. 

गिरीजा तिच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतेच पण सध्या ती सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आली आहे.

गिरीजा ओक हिने इंस्टाग्रामवर पर्पल चेक्स साडीतील फोटो शेअर केले आहेत. 

साडीत गिरीजा खूपच सुंदर दिसते आहे. तिने केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे.

गिरीजा ओकच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

गिरीजा ओक नुकतीच इंस्पेक्टर झेंडे या सिनेमात पाहायला मिळाली. यात तिने मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

Click Here