जिनिलियाच्या हटके फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलियाला ओळखलं जातं. जिनिलियाने तिच्या आजवरच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केलं आहे.
जिनिलियाने बॉलिवूड, तेलगू आणि तमीळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
नुकतेच जिनिलियाने सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सोज्वळ दिसते आहे.
जिनिलियाच्या या फोटोंना चाहत्यांची खूपच पसंती मिळताना दिसते आहे.
जिनिलिया शेवटची आमिर खानसोबत सितारे जमीन पर सिनेमात दिसली होती.