महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे.
नुकतंच जिनिलियाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने खास लूक केल्याचं दिसत आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने पारंपारिक लूक केला आहे.
जिनिलियाने काठपदरी साडी नेसली आहे आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.
जिनिलियाने नाकात नथ, केसांचा आंबाडा आणि त्यावर छान गजरा माळला आहे.
या फोटोत जिनिलिया खूपच सुंदर दिसते आहे. तिचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.