ऐश्वर्याची ड्युप्लिकेट अभिनेत्री आठवतेय का?

स्नेहा उल्लाल सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब, लेटेस्ट फोटो आले चर्चेत

२००५ साली लकी नो टाईम फॉर लव्ह चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. ही लकी गर्ल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरीदेखील आजही ती प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे.

 तिचा निरागस चेहरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्या लुक्सची तुलना नेहमीच ऐश्वर्या राय बच्चनसोबत होते. 

लकी चित्रपटातून आपल्या सिनेकारकीर्दीला सुरूवात केल्यानंतर स्नेहा उलाल सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. 

नंतर तिने सांगितले की, ती एका गंभीर आजाराशी सामना करत होती. त्यामुळे तिला जास्त काळ उभे राहता येत नव्हते आणि चालतादेखील येत नव्हते. त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीपासून दूर रहावे लागले होते.

 शेवटची ती बॉलिवूडमध्ये २०१५ साली बेजुवां इश्कमध्ये झळकली होती. तसेच ती आता मॉडेलिंग करताना दिसते आहे.

Click Here