मराठमोळी तेजस्वी प्रकाश हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तेजस्वीने २०१२ साली म्हणजेच १२ वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून तेजस्वी काम करत आहे.
तेजस्वीचं वय माहितीये का? ती ३२ वर्षांची आहे. १० जून, १९९३ रोजी तिचा जन्म झाला.
तेजस्वी प्रकाशने 'बिग बॉस १५'चं विजेतेपदही पटकावलं. या शोमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
यानंतर ती 'खतरो के खिलाडी'मध्येही झळकली. याशिवाय तेजस्विनी प्रकाशने दोन मराठी चित्रपटात कामही केलंय.
तेजस्वीने 'मन कस्तुरी रे' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या मराठी सिनेमात काम केलं.
तेजस्वी प्रकाशने आता तिचा मोर्चा हिंदी सिनेमांकडे वळवला आहे.