अवनीत कौर सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अवनीत कौरने हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते. ती एक उत्तम नृत्यांगना आणि मॉडेल म्हणूनही ओळखली जाते.
अवनीतने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि आज ती सोशल मीडियावर एक मोठी इन्फ्लुएन्सर म्हणूनही लोकप्रिय आहे.
अवनीतने २०१० साली 'डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर्स' या रिॲलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर, ती 'डान्स के सुपरस्टार्स' या शोमध्येही सहभागी झाली.
अवनीतने २०१२ मध्ये 'मेरी माँ' या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. यानंतर तिने 'सावित्री' आणि 'एक मुठ्ठी आसमान' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले.
अवनीतला सर्वाधिक प्रसिद्धी 'अलादीन - नाम तो सुना होगा' या मालिकेतून मिळाली.
अवनीतने 'मर्दानी', 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमात काम केले.
अवनीत कौर फक्त २३ वर्षांची असून तिला खूप कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.