'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून दिया मिर्झा नावारुपाला आली.
९० च्या दशकात आपल्या अदाकारिने तसेच अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा.
आपल्या गोड आवाजाने आणि सौंदर्याने तिनं चाहत्यांची मनं देखील जिंकली.
दीयाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
या फोटोंची खासियत म्हणजे यामध्ये दियाने अतिशय सुंदर लाल कलरचा एथनिक ड्रेस परिधान केला आहे.
लाल अनारकली ड्रेसवर केस मोकळे सोडून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केलाय.
या ड्रेसमध्ये दीया मिर्झा खूपच सुंदर दिसते आहे.
'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.