श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

अपूर्वा नेमळेकरचा राधा लूक चर्चेत

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अपूर्वा शेवटची प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

प्रेमाची गोष्ट मालिकेनं निरोप घेतला असून यातील कलाकार आजही रसिकांच्या मनात घर करुन कायम आहेत.

अपूर्वाने नुकतेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हटके फोटोशूट केलंय. ते फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

या फोटोशूटमध्ये तिने राधाचा लूक केलाय. वाइन रंगाचा लेहंगा परिधान केलाय. त्यावर बेज रंगाची ओढणी घेतलीय.

हातात मोरपीस घेऊन अपूर्वाने हे फोटोशूट केलंय.

अपूर्वाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here