मन धावतंया
तुझ्याच मागं...

अपूर्वा गोरेचं लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूट चर्चेत

अपूर्वा गोरे मराठी टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री आहे. ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत पाहायला मिळाली होती.

'आई कुठे काय करते' या मालिकेत तिने ईशाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

या मालिकेनंतर आता अपूर्वा गोरे 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकात काम करते आहे.

अपूर्वा गोरे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

अपूर्वा गोरेने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. 

या फोटोत अपूर्वाने लाल रंगाच्या ड्रेसवर मोठे इअररिंग्स घातले आहेत आणि केस मोकळे सोडून लूक पूर्ण केलाय. अपूर्वाच्या या फोटोशूटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here