अभिनेत्रीचे मराठमोळ्या साजश्रृंगारातील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अपूर्वा गोरे टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे. तिने 'आई कुठे काय करते' मालिकेत काम केले होते.
अपूर्वाने आई कुठे काय करते मालिकेत ईशाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
मालिका संपली असली तरी ईशाच्या भूमिकेतून अपूर्वाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
अपूर्वा गोरे सध्या लेटेस्ट फोटोंमुळे ती चर्चेत आलीय. तिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलंय.
अपूर्वा गोरेने या फोटोशूटमध्ये पिंक रंगाची साडी नेसली आहे. त्यावर हेवी वर्क असलेला ब्लाउज परिधान केलाय.
अपूर्वाने साडीवर नाकात नथ, गळ्यात हेवी नेकलेस घातला आहे. केस मोकळे सोडून तिने तिचा लूक पूर्ण केलाय.
अपूर्वाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.