सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
मराठी सिनेइंडस्ट्रीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सिनेमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.
१८ मे १९८८ रोजी पुण्यात लष्करी हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या सोनालीचे बालपण एका शिस्तबद्ध, लष्करी वातावरणात गेले.
वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर आणि आई सविंदर पंजाबी असून त्यांनी देखील लष्करी सेवेत काम केले.
सोनालीने तिचे शिक्षण आर्मी स्कूल आणि केंद्रीय विद्यालयातून घेतल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदवी घेतली.
अभिनयापूर्वी ती एक प्रशिक्षित पत्रकार होती आणि नंतर इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
पण अभिनयाची आवड तिला बालपणापासून होतीच. ‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेतून तिने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
याच मालिकेच्या सेटवर तिला 'गाढवाचं लग्न' या चित्रपटाची छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तिला ‘बकुळा नामदेव घोटाळे’मध्ये मुख्य भूमिका दिली.
सोनालीने ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘शटर’, ‘पोस्टर गर्ल’, ‘रमा माधव’ या सिनेमातच काम केलंय. ‘ग्रँड मस्ती’, ‘सिंघम रिटर्न्स’ या हिंदी चित्रपटातही ती झळकली आहे.