'चंद्रमुखी'च्या
 ग्लॅमरस अदा!

अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोंवरुन नजर हटत नाहीये.

अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीतील या चंद्रमुखीने बॉलिवूडही गाजवलं आहे.

अमृताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अमृता खानविलकरने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अमृताच्या कातिल अदा दिसत आहे. तिच्या या फोटोंवरुन नजर हटत नाहीये.

अमृताच्या या ग्लॅमरस अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अमृताने चंद्रमुखी, कट्यार काळजात घुसली, साडे माडे तीन, जीवलगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या मराठी सिनेमात तर राझी, रंगून, सत्यमेव जयते या हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.

Click Here