नाकात नथ, पारंपरिक कोळी पेहरावात अभिनेत्रीनं केलं खास फोटोशूट
नारळी पौर्णिमेनिमित्त तेजस्विनी लोणारी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात ती समुद्रकिनारी पारंपरिक कोळी पोशाखात उभी असून, तिचा लूक खूपच सुंदर आहे.
तेजस्विनी फोटो शेअर करत लिहिले की, समुद्राशी नातं फक्त लाटांचं नाही, तर भावनांचं आहे… त्या नात्याला साजरी करणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने 'गुलदस्ता', 'वाँटेड बायको नंबर वन', 'अफलातून', 'बर्नी' आणि 'छापा काटा' अशा काही सिनेमांमध्ये काम केलंय.
गजबजारी, माझिया प्रितीचा रंग घेवडा, माणूसकी झिंदाबाद’ यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे.