कुणी तरी येणार, येणार गं..!

मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिलीय. 

'लग्नाची बेडी' मालिकेतील काजल म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा चिपडे लवकरच आई होणार आहे.

 तिचे नुकतेच डोहाळ जेवण साजरे करण्यात आले आहे. 

तिने डोहाळं जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने डार्क हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यात तिचा बेबी बंप दिसत आहे. 

ऋतुजाच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

ऋतुजा चिपडे हिने स्वरूप कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली आहे. 

लग्नाची बेडी मालिकेनंतर ऋतुजाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. 

याआधी ती बायको अशी हवी, यशोदा, हिमालयाची सावली सुखी माणसाचा सदरा, डीव्होर्स के लिए कुछ भी करेगा या हिंदी सीरिज, नाटक, मालिकेतून ती झळकली आहे

Click Here