अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो आले चर्चेत
अभिनेत्री पायल जाधव अबीर गुलाल मालिकेतून घराघरात पोहचली.
तिने अबीर गुलाल व्यतिरिक्त परीस, गोलमाल या मालिकेत काम केले आहे.
याशिवाय पायल जाधवने बापल्योक चित्रपट व मानवत मर्डर्स वेबसीरिजमध्ये काम केलंय. बापल्योकमधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.
शेवटची ती सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमात झळकली होती. तिने त्याच्या बहिणीची भूमिका केली होती.
आता पायल जाधव तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने परिधान केलेल्या आउटफिटमधून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
पायल जाधव बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.