अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
ज्योती निमसे टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेत काम करते आहे.
या मालिकेत ज्योतीने पूजाची भूमिका साकारली आहे. ही एक ग्रे शेड भूमिका आहे.
ज्योतीने पूजाच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे.
ज्योती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे आणि नुकतेच तिने फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये ज्योतीने ब्लॅक ड्रेस घातला आहे आणि त्यावर जॅकेट परिधान केला आहे. गॉगल लावून तिने लूक पूर्ण केलाय.
ज्योती निमसे या फोटोशूटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.