अनघा अतुलचा मराठमोळा लूक चर्चेत
अनघा अतुल मराठी कलाविश्वातील अभिनेत्री असून तिने मालिका आणि नाटकात काम केले आहे.
अनघा अतुलला रंग माझा वेगळा मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
अनघा रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
याशिवाय अनघा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच अनघा अतुलने सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
फोटोत अनघाने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केलाय.
साडीवर तिने मोत्यांचे दागिने घातले आहेत. नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि केस मोकळे सोडून तिने लूक पूर्ण केलाय.
या फोटोत अनघा खूपच सुंदर दिसते आहे. तिने छान पोझ दिल्या आहेत. अनघा अतुलच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.