अभिज्ञाकडे हनुमानरुपी बाप्पा विराजमान

अभिज्ञा भावेनं तिच्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

आज सगळीकडे गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय.

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झालेत. तिने तिच्या बाप्पाची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे.

अभिज्ञाच्या घरी यंदा राम भक्त पवन पुत्र हनुमान रुपातील बाप्पा विराजमान झाले आहेत.

बाप्पाची मूर्ती हनुमानरुपी असून त्याच्या मागे हनुमानाची प्रतिकृती बनवली आहे.

त्यांनी डेकोरेशनदेखील त्यापद्धतीने केले आहे. खूपच छान सजावट केलेली पाहायला मिळत आहे.

तिने फोटो शेअर करत लिहिले की, राम दूत अतुलित बल धामा|| अंजनी पुत्र पवनसुत नामा|| यावर्षी आहेत विराजमान, राम भक्त पवन पुत्र हनुमान. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिज्ञाच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

Click Here