‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधील कलाकार कोणते? आता काय करतात?
स्मृती इराणी पुन्हा एकदा ‘तुलसी’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला
'क्यूँकी सास भी कभी बहू थी' ही मालिका जुलै २००० मध्ये ऑन एअर झाली होती. २००० ते २००८ या काळात 'स्टार प्लस' वाहिनीवर या मालिकेने अधिराज्य गाजवलं होतं.
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांना याच मालिकेमुळे घराघरांत ओळख मिळाली होती. यात त्यांनी 'तुलसी विरानी' ही भूमिका साकारली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
आता पुन्हा स्मृती इराणी चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'ची पहिली झलक समोर आली आहे. यानिमित्तानं आपण 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेतील कलारांविषयी जाणून घेऊया.
स्मृती इराणी यांच्याशिवाय या मालिकेत अभिनेता अमर उपाध्यायने मिहिर विरानीची भूमिका साकारली होती. काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. अमर अजूनही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहे.
मिहिर विराणीनं मालिका सोडल्यानंतर त्याची जागा रोनित रॉयने घेतली. त्याची ही भूमिका हिट झाली.
या मालिकेतील पूजा विरानीची भूमिका अभिनेत्री प्राची शाहने साकारली होती.
पायल मेहराची नकारात्मक भूमिका तुम्हाला चांगलीच आठवत असेल. ही भूमिका अभिनेत्री जया भट्टाचार्यने साकारली होती.
करण विराणीची भूमिका हितेन तेजवानी यांनी साकारली होती.
अभिनेत्री मौनी रॉय हिने कृष्णा तुलसी विराणीची भूमिका साकारली होती. आज मौनी ही एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
करिश्मा तन्ना हिनेही या प्रसिद्ध टीव्ही सीरियलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. आता ती खूप बदलली आहे.