फोटो शेअर करत म्हणाला 'आता लग्न करुन...'
'बिग बॉस मराठी' व 'बिग बॉस हिंदी'मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरेनं नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
शिवने सोशल मीडियावर बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
यासोबतच त्याने एक मजेशीर आणि खास कॅप्शन लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवने आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर करताना लिहिले, “वर्षभरानं मोठं होताच लोक म्हणतात, "आता तरी लग्न करून टाक बेटा!"
यासोबतचं शिवने आपल्या चाहत्यांचे आणि मित्र-मैत्रिणींचेही आभार मानले.
"माझा वाढदिवस खास केल्याबद्दल, सर्वांच्या शुभेच्छा, मेसेजेस आणि प्रेमासाठी मनापासून धन्यवाद!" असे म्हणत त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
कॅप्शनच्या शेवटी त्याने "बाप्पा तुमच्यावर कृपा करो, गणपती बाप्पा मोरया!" असं म्हटलं.
शिवने शेअर केलेल्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.