दोघांच्या फोटोंना भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या फोटोंनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकत्याच दिवाळीनिमित्ताने केलेल्या एका फोटोशूटमधून त्यांच्यातील केमिस्ट्रीची झलक स्पष्टपणे दिसली.
निक्कीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने साडी नेसली आहे.
अनेकदा बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर करणाऱ्या निक्कीच्या या पारपंरिक लूकला चाहत्यांचीही पसंती मिळाली.
अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करुन निक्की अरबाजचं कौतुक केले आहे.
'बिग बॉस मराठी ५'च्या घरात असताना निक्की आणि अरबाजची जोडी जमली होती.
शो संपल्यानंतरही ही जोडी तुटली नाही. 'बिग बॉस मराठी ५' नंतरही निक्की-अरबाज हे एकमेकांच्या अधिक जवळ आले.
आता ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना अनेकदा दिसून येतात.