दिसते फारच बोल्ड अन् सुंदर
बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांचं राजकीय कनेक्शन आहे.
अशीच एक अभिनेत्री आहे नेहा शर्मा.
२१ नोव्हेंबर १९८७ रोजी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नेहा शर्माचे वडील बिहारच्या राजकारणातील मोठं नाव आहे.
तिचे वडील अजीत शर्मा काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत.
नेहा शर्मा अनेक वर्षांपासून वडिलांसाठी निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना दिसते.
अजित शर्मा यांनी २०१४ ची पोटनिवडणूक आणि त्यानंतर २०१५ व २०२० च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून तीन वेळा आमदार होण्याचा मान मिळवला होता.
मात्र २०२४ ची लोकसभा आणि आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेहाचे वडील विजय मिळू शकले नाही.
नेहा शर्माने २००७ मध्ये तेलगू चित्रपट 'चिरुथा' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
त्यानंतर २०१० मध्ये 'क्रुक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.