मराठी अभिनेत्रीनं अनुभवलं जगप्रसिद्ध 'नायगारा' धबधब्याचे भव्य सौंदर्य

शेअर केले सुंदर फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा भगरे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अनघा सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अनघाने नुकतंच जगप्रसिद्ध 'नायगारा' धबधब्याला भेट दिली.

"जिथे निसर्ग आपले सौंदर्य उधळतो, तिथे उभे राहून..." असे कॅप्शन अनघाने या फोटोंना दिले आहे.

नायगारा धबधबा अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर निआग्रा नदीवर स्थित आहे.

याच्या एका बाजूला अमेरिका आहे तर, दुसऱ्या बाजूला कॅनडा आहे. हा धबधबा दोन्ही देशांना जोडलेला आहे.

हा धबधबा जगभरात आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी परिचीत आहे.

अनघानं शेअर केलेले हे नयनरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Click Here