युवराज सिंगसह ED च्या रडारवर आल्यामुळे चर्चेत आलेले ४ क्रिकेटर

आतापर्यंत कोण कोणत्या क्रिकेटरची झालीये चौकशी

1xBet' नावाच्या अवैध ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात काही क्रिकेटर्स ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यात युवाचाही समावेश आहे. 

ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या प्रकरणात युवीला ED नं नोटीस धाडलं होते. क्रिकेटर  ईडी कार्यालयात पोहचल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

युवराज सिंगनं भारतीय  संघाला टी-२० सह वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात याआधी ईडीनं  भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाची कसून चौकशी केली होती. 

याच प्रकरणात IPL स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या माजी क्रिकेटरसुरेश रैनाचीही ED च्या कार्यालयात बोलवून प्रश्नांचा मारा करण्यात आला होता. 

 भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन देखील 1xBet' नावाच्या अवैध ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात ईडीच्या रडारवर आलेल्या क्रिकेटरपैकी एक आहे.

Click Here