कॅनडाचा पठ्ठ्या ठरला जगात भारी!
कॅनडाच्या युवराज सामरानं न्यूझीलंडविरुद्धच्या चेन्नईच्या मैदानातील सामन्यात शतकी खेळीसह अनेक विक्रम प्रस्थापित केले.
यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकवाताना त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
१९ वर्षे आणि १४१ दिवस वयात शतकी खेळीसह तो टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात युवा शतकवीर ठरला.
या यादीत पाकिस्तानचा अहमद शहजाद दुसऱ्या स्थानावर आहे. २०१४ च्या हंगामात त्याने २२ वर्षे १२७ वय असताना बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले होते.
२०१० च्या हंगामात सुरेश रैनानं २२ वर्षे १५६ इतके वय असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
इंग्लंडच्या एलेक्स हेल्सन याने २०१४ च्या हंगामात श्रीलंकेविरुद्ध २५ वर्षे ८३ दिवस वय असताना शतक साजरे केले होते.
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सनं २०२२ च्या हंगामात २५ वर्षे ३२७ वय असताना श्रीलंकेविरुद्ध शतकी धमाका केला होता.