टीम इंडियाच्या सलामीवीरांचा रेकॉर्ड
यशस्वी जैस्वालनं ओव्हल कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील सहावे अन् इंग्लंडविरुद्धचे चौथे शतक साजरे केले.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतक झळकवणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे.
लोकेश राहुल या यादीत टॉपला आहे. १६ कसोटी सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
यशस्वी जैस्वालनं अवघ्या १० सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी 'चौकार' मारला आहे.
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध १३ सामन्यात डावाची सुरुवात करताना ४ शतके झळकावली आहेत.
लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी ३७ कसोटी सामन्यात सलामीवीराच्या रुपात ४ शतके झळकावली आहेत.
विजय मर्चंट यांच्या नावे इंग्लंडविरुद्ध ७ सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करताना ३ शतके झळकावल्याचे रेकॉर्ड आहे.
मुरली विजय याने इंग्लंडविरुद्ध भारताच्या डावाची सुरुवात करताना ११ सामन्यात ३ शतके झळकावली आहेत.