कुणाचा पत्ता होणार कट?
यशस्वी जैस्वाल हा टीम इंडियातील प्रतिभावनंत सलामीवीर आहे. पण आशिया कप स्पर्धेत त्याला संघात स्थान मिळवणं कठीण दिसते.
कारण टी-२० संघात अभिषेक शर्मा अन् संजू सॅमसन ही जोडी हिट ठरलीये. आशिया कप स्पर्धेसाठी BCCI याच जोडीवर भरवसा दाखवेल, असे दिसते.
इंग्लंड दौऱ्यावर रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला.आशिया कप स्पर्धेला तो मुकणार आहे.
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी तगडी स्पर्धा आहे. आशिया कपसाठी टी-२० संघात रिंकू सिंहची एन्ट्री होणंही मुश्किल झाले आहे.
केएल राहुल याने कसोटीत धमक दाखवण्याआधी आयपीएलमध्येही आपला क्लास दाखवलाय. पण तोही टी-२० संघात फिट होत नाही.
आशिया कपसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू पहिली तर जितेश शर्मा ही दुसरी पसंती आहे. त्यामुळे ध्रुव जेरेल संघाबाहेरच राहिल.