WTC मध्ये सर्वाधिक वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधणारे ५ सलामीवीर

 यशस्वीनं २ दिग्गजांना केलं ओव्हरटेक

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी केली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी अर्धशतकासह WTC स्पर्धेत सर्वाधिक वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधणारा तो दुसरा सलामीवीर ठरला आहे.

WTC स्पर्धेत यशस्वी जैस्वालनं आतापर्यंत २० वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

या यादीत श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने सर्वात आघाडीवर आहे. त्याने सलामीवीराच्या रुपात २१ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

इंग्लंडच्या झॅक क्राउलीनं WTC मध्ये आतापर्यंत १९ वेळा ५० प्लसचा डाव साधला आहे. 

ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत १९ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.

 आघाडीच्या ५ सलामीवीराच्या यादीत न्यूझीलंडच्या टॉम लॅथमही आहे. त्याने १८ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

Click Here