टॉप १० मध्ये भारतीयांचा जलवा
इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स ८६ षटाकारांसह WTC मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.
रिषभ पंत याने WTC स्पर्धेत आतापर्यंत ७५ षटकार मारले आहेत. यंदाच्या चक्रात त्याला नंबर वन होण्याची संधी आहे.
हिटमॅन रोहित शर्मानं आपल्या कसोटी कारकिर्दीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ५६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार शुभमन गिल याने WTC स्पर्धेत ४६ षटकार मारले आहेत.
भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वाल WTC स्पर्धेत ४३ षटकारांसह टॉप ५ मध्ये दिसतो.
ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने WTC स्पर्धेत फलंदाजीत खास छाप सोडताना ४० षटकार लगाले आहेत.
इंग्लंडचा हॅरी ब्रूक याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ३६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
न्यूझीलंडचा स्टार बॅटर डॅरिल मिचेल याने WTC स्पर्धेत आतापर्यंत ३४ षटकार लगावले आहेत.
इंग्लंडचा बॅटर जॉनी बेअरस्टो ३२ षटकारांसह WTC स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅटर ट्रविस हेड याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ३१ षटकार मारल्याचा विक्रम आहे.