टॉप १० मध्ये किती भारतीय?
दिप्ती शर्मासाठी यूपी वॉरियर्सच्या संंघाने ३ कोटी २० लाख रुपये मोजले. तिची मूळ किंमत ५० लाख एवढी होती.
मुंबई इंडियन्सच्या संघाने ५० लाख मूळ किंमत असलेल्या ऑलराउंडर अमेलिया केरसाठी ३ कोटी रुपये मोजले.
भारताच्या शिखा पांडेसाठी यूपी वॉरियर्सच्या संघाने २ कोटी ४० लाख रुपये मोजले. ती भारताची दुसरी महागडी खेळाडू ठरली.
सोफी डिव्हाईनसाठी गुजरात जाएंट्सच्या संघाने २ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली. ५० लाखांच्या मूळ किंमतीसह ती लिलावात सामील झाली होती.
मेग लॅनिंगसाठी यूपी वॉरियर्सच्या संघाने १ कोटी ९० लाख रुपये मोजले. तिची मूळ किंमत ५० लाख एवढी होती.
भारताची ऑलराउंडर श्री चरणीसाठी दिल्ली कॅपिटल्सने १ कोटी ३० लाख एवढी बोली लावली. तिची मूळ किमंत फक्त ३० लाख एवढी होती.
वेस्ट इंडिजची ऑलराउंडर चिनले हेन्रीसाठी दिल्ली कॅपिटल्सनं १ कोटी ३० लाख रुपये मोजले. तिची बेस प्राइज ३० लाख इतकी होती.
५० लाख बेस प्राइज असलेल्या फिबी लिचफिल्डसाठी यूपी वॉरियर्सनं १ कोटी २० लाख रुपये मोजले.
वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या लॉरा वोल्वार्ड्टला दिल्ली कॅपिटल्सने १ कोटी १० लाखांसह आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.
भारताची आशा सोभणासाठी यूपी वॉरियर्सनं १ कोटी १० लाख रुपये मोजले. तिची बेस प्राइज ३० लाख होती.