अन् ही जोडी जमली!
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतकी खेळीसह मैफील लुटली.
टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात सेंच्युरी झळकवणारा तो पहिला कर्णधार ठरला.
इंग्लंडचा हा क्रिकेटर मैदानातील कामगिरीशिवाय लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील 'स्वप्नसुंदरी'सोबतचे खास फोटो शेअर करताना दिसते.
हॅरी ब्रूकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव लुसी लायल्स असं आहे. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी या जोडीनं साखरपुडा उरकल्याची घोषणा केली होती.
५ वर्षे एकमेकांसोबत डेटिंगचा खेळ खेळल्यावर या जोडीनं आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
लुसी ही मँचेस्टर विद्यापीठातील पदवीधर आहे. तिने बिझनेस आणि मॅनेजमेंट विषयात पदवी संपादन केली आहे.
ती शिक्षण आणि मानसिक आरोग्य (mental health) या क्षेत्रांशी संबंधित सामाजिक आणि धर्मादाय उपक्रमांमध्ये सक्रिय असते.