RCB च्या मेगा डीलनंतर 'ती' चर्चेत
आयपीएल २०२६ स्पर्धेआधी RCB च्या मेगा डीलसोबतच एक नवा चेहरा चर्चेत आला आहे.
RCB संघ नव्या मालकाचा झाला असून आदित्य बिर्ला समूहातील हा लोकप्रिय चेहराही आता IPL फ्रँचायझीसंघाशी कनेक्ट झाला आहे.
अनन्या बिर्ला ही आदित्य बिर्लाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या आहे. ती RCB च्या संघ सहमालकांपैकी एक बनली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात खास छाप सोडणाऱ्या अनन्या बिर्ला हिचे नेटवर्थचा आकडा हा १००० ते १७०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
अनन्या बिर्ला हे नाव फक्त उद्योगजगतापुरते मर्यादीत नाही. या चेहऱ्याने पॉप सिंगरच्या रुपातही खास छाप सोडली आहे.
कमाईच्या बाबतीत अनन्या बिर्ला RCB चा स्टार विराट कोहलीपेक्षाही पुढे असल्याचे दिसून येते. याचीही सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.
एकाच वेळी अनेक क्षेत्रात सक्रीय असणारी अनन्या बिर्ला समूहातील विविध व्यवसायांमध्ये संचालक पदावरही कार्यरत आहे.
अनन्या बिर्ला अवघ्या १७ व्या वर्षी स्वतंत्र मायक्रोफायनान्स कंपनीची स्थापना केली. त्यामुळेच हा चेहरा भारतातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक ठरला.
वयाच्या नवव्या वर्षांपासून संगीताची आवड असलेली अनन्या बिर्ला ही भारतातील सर्वात यशस्वी इंग्लिश पॉप गायिकांपैकी एक आहे.