Live TV वर प्रपोजनं चर्चेत आलेली करिश्मा कोटक कोण आहे?

अँकर आणि मॉडेल असलेल्या करिश्मा कोटकचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे

या मुलाखतीत करिश्माने त्यांना टुर्नामेंटचं यश कसं साजरं करणार हे विचारले, त्यावर हर्षित यांचं उत्तर करिश्माला हैराण करणारे होते.

हर्षित म्हणाला की, आता सगळं संपलंय, मी तुला प्रपोज करायला हवं.' त्याचं उत्तर ऐकून करिश्मा व्हिडिओसमोर लाजली

करिश्मा कोटक ही एक ब्रिटिश मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर आहे. तिने अनेक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे

करिश्मा कोटकचा जन्म २६ मे १९८२ रोजी लंडनमध्ये झाला. तिचे वडील मूळचे गुजराती होते आणि आई पूर्व आफ्रिकन वंशाची आहे

करिश्माने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर २० व्या वर्षी ती भारतात फॅशन आणि चित्रपट उद्योगात काम करू लागली

करिश्माचे कुटुंब लंडनमध्ये राहते. करिश्मानं जाहिरात आणि मार्केटिंगमध्ये पदवी घेतली आहे. २००५ मध्ये करिश्मा मुंबईत राहायला आली

Click Here