भारत-दक्षिण आफ्रिका वनडेत सर्वाधिक शतके झळकवणारे ७ फलंदाज

विराट कोहलीला मोठा डाव साधण्याची संधी 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये  ६ शतकांसह क्विंटन डी कॉकच्या अव्वलस्थानी आहे. 

एबी डिव्हिलियर्सनं भारतीय संघाविरुद्धच्या वनडे सामन्यात ६  शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

किंग कोहली या यादीत ५ शतकांसह तिसऱ्या स्थानावर असून २ शतकांसह तो दक्षिण आफ्रिकेच्या दोन दिग्गजांना मागे टाकू शकतो. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत पहिली द्विशतकी खेळी करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या खात्यात ५ शतकांची नोंद आहे.

गॅरी कर्स्टन यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत भारतीय संघाविरुद्ध २६ सामन्यात ४ शतके झळकावली आहेत.

शिखर धवन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ वनडे सामन्यात ३ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

हिटमॅन रोहित शर्मानं आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत २६ सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ शतके झळकावली आहेत.

Click Here