IND vs SA ODI Most Runs : सचिन टॉपर! कोहलीची नजर कॅलिसच्या रेकॉर्डवर!

एक नजर वनडेतील खास रेकॉर्डवर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वात आघाडीवर आहे. 

तेंडुलकरनं १९९१ ते २०११ या कालावधीत ५७ सामन्यातील ५७ डावात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत २००१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

जॅक कॅलिस याने १९९६ ते २०१३ या कालावधीत ३७ सामन्यातील ३४ सामन्यात १५३५ धावा केल्या आहेत. 

विराट कोहलीला हा आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये एकमेव सक्रीय फलंदाज आहे. त्याने ३१ सामन्यातील २९ डावात १५०४ धावा केल्या आहेत. 

आगामी वनडे मालिकेत जॅक कॅलिसला ओव्हरटेक करत कोहलीला नंबर दोनवर पोहचण्याची संधी असेल. यासाठी त्याला फक्त ३१ धावांची आवश्यकता आहे.

गॅरी क्रस्टन यांनी १९९५-२००१ या कालावधीत २६ सामन्यातील २६ डावात भारताविरुद्ध १३१७ धावा केल्या आहेत. 

एबी डिव्हिलियर्सचाही या यादीत सामावेश आहे. २००५ ते २०१८ या कालावधीत त्याने ३२ सामन्यातील ३२ डावात १३५७ धावा केल्या आहेत.

Click Here